दिर्घ कथा लेखन स्पर्धा...
डिसेंबर व जानेवारी...२०२५-२०२६
डिसेंबर व जानेवारी...२०२५-२०२६
"काय माझा गुन्हा...?" भाग ५
गौरवीच्या आयुष्यातील एक मोठा, दुखरा अध्याय...
जिथे प्रेम, विश्वास आणि स्वप्नांचा संगम होता...
तो आता कायमचा बंद झाला होता...
आणि त्या बंद झालेल्या दरवाज्यासोबत
तिच्या हृदयातली शेवटची उमेदही जणू बाहेर फेकली गेली होती...
जिथे प्रेम, विश्वास आणि स्वप्नांचा संगम होता...
तो आता कायमचा बंद झाला होता...
आणि त्या बंद झालेल्या दरवाज्यासोबत
तिच्या हृदयातली शेवटची उमेदही जणू बाहेर फेकली गेली होती...
पावसाच्या घणघणीत कोसळणाऱ्या थेंबांनी
तिच्या डोळ्यांतून वाहणाऱ्या खारट अश्रूंना
कुठलंच वेगळेपण दिलं नाही...
दोन्ही एकमेकांत मिसळून
ओल्या गालांवरून शांतपणे वाहत होते...
जणू आकाशही तिच्या वेदनेचा मूक साक्षीदार झाला होता...
ती तिथेच उभी राहिली...
निश्चल, शांत, सुन्न...
पायाखालील चिखलात तिच्या चपला रुतलेल्या,
जशा तिच्या आयुष्याच्या वाटा
अचानक थांबून गेल्या होत्या....
तिचं संपूर्ण अस्तित्व...,
बालपणीचे निष्पाप खेळ...,
पहिल्या प्रेमाची हळवी कुजबुज...,
लग्नाची स्वप्नं...,
आणि भविष्याच्या रंगीत कल्पना...
सगळं गाळासारखं निसटून जात असल्याचं तिला जाणवत होतं...
हृदयात एक गडद, विरळ शून्य पसरत होतं,
जे आतल्या आत व्यथेने भरून येत होतं,
जणू तिच्या अंतर्मनालाच
या पावसाने पूर्णपणे भिजवून टाकलं होतं...
त्या क्षणी तिच्या मनात एकच प्रश्न उमटला...
"आता पुढे काय...?"
आई-वडिलांचे चेहरे क्षणभर डोळ्यांसमोर तरळले,
पण उत्तर शोधण्याची ताकदही
ओल्या, थंड कपड्यांसोबत
पावसात विरघळून गेली होती...
पण उत्तर शोधण्याची ताकदही
ओल्या, थंड कपड्यांसोबत
पावसात विरघळून गेली होती...
गल्लीच्या टपरीवर उभी असलेली एक वृद्ध स्त्री
तिच्याकडे संमिश्र नजरेने पाहत होती...
दया, कुतूहल आणि उपेक्षा यांचा गोंधळ तीच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता...
पण गौरवीला मात्र समोरचं काहीच दिसत नव्हतं...
ती फक्त उभी होती... पावसात भिजत,
स्वतःच्या तुटलेल्या स्वप्नांच्या ओझ्याखाली,
नव्या आयुष्याच्या अनिश्चिततेत हरवत...
स्वतःच्या तुटलेल्या स्वप्नांच्या ओझ्याखाली,
नव्या आयुष्याच्या अनिश्चिततेत हरवत...
कदाचित हा अंत...
एका नव्या सुरुवातीचा जन्म असेल…
पण या क्षणी
तिच्या वाट्याला फक्त वेदना
आणि असह्य शांतताच आली होती...
एका नव्या सुरुवातीचा जन्म असेल…
पण या क्षणी
तिच्या वाट्याला फक्त वेदना
आणि असह्य शांतताच आली होती...
ππππππππππππππππππππ
दरवाजा बंद होताच घरातल्या मंद प्रकाशात नणंद आणि सासू एकमेकांकडे पाहून हळूच कपटी स्मित करतात...
नणंदच्या डोळ्यांत उमटलेली चमक केवळ विजयाची नव्हती...
ती वर्षानुवर्षे मनात साठवलेल्या जातीद्वेषाच्या तृप्तीची होती...
ती वर्षानुवर्षे मनात साठवलेल्या जातीद्वेषाच्या तृप्तीची होती...
तिचे ओठ थरथर कापत हसत होते,
जणू “आपल्या जातीच्या पवित्र घरातून त्या खालच्या जातीची सावली दूर झाली...”
याचाच विषारी आनंद तिच्या हसण्यातून ओसंडून वाहत होता...
जणू “आपल्या जातीच्या पवित्र घरातून त्या खालच्या जातीची सावली दूर झाली...”
याचाच विषारी आनंद तिच्या हसण्यातून ओसंडून वाहत होता...
सासूबाईंच्या चेहऱ्यावर मात्र एक कठोर आत्मसंतोष पसरलेला होता....
कपाळावरच्या खोल सुरकुत्यांच्या रेषा जणू सैल झाल्यासारख्या वाटत होत्या...,
आणि डोळ्यांत कटु समाधान चमकत होतं...
जणू घराची जात, घराची मर्यादा आणि घराचा अहंकार
आज पुन्हा एकदा सुरक्षित झाला होता...
नणंद हळू आवाजात, उत्साह आणि घृणेच्या मिश्रणात कानोसा घेत... हातातलं मंगळसूत्र आईसमोर धरत ती कुजबुजत म्हणते...
“आई… हे तर काम एकदम मस्त आणि फस्त झालं ग...!
काय समजून आली होती आमच्या घरात स्वतःला ती...?
आपल्या घरात राहून आपल्याशी बरोबरी करायची तीची हिंमतच कशी झाली होती...?
त्या खालच्या जातीची मुलगी… आणि स्वप्नं मात्र मोठ्या जातीच्या घराची...!” आणि ती हसु लागते...

पण ते हसू नव्हतं,
तो जातीय अहंकाराचा ठसठशीत ठोसा होता...
“आता दादा कधीच तिच्यावर विश्वास ठेवणार नाही...
ती कितीही रडली, शप्पथा घेतल्या तरी…
एकदा ‘चारित्र्यहिन’ हा शब्द डोक्यात बसला की,
अशा मुलींना कोण ऐकून घेतो, काय आई... बरोबर ना...?”

तिच्या श्वासात घाई होती...
हाताची बोटं एकमेकांत घट्ट गुंफत ती बोलत होती...
जणू हा कट केवळ एका स्त्रीविरोधात नव्हता,
तर ‘आपल्यापेक्षा खालच्या जातीने वर यायचं धाडस केलं’
याच्याविरुद्धचा सूड होता...
हाताची बोटं एकमेकांत घट्ट गुंफत ती बोलत होती...
जणू हा कट केवळ एका स्त्रीविरोधात नव्हता,
तर ‘आपल्यापेक्षा खालच्या जातीने वर यायचं धाडस केलं’
याच्याविरुद्धचा सूड होता...
सासूबाई जमिनीवर पडलेला तो ओला टॉवेल हळूच उचलतात...
हातात घेतलेल्या त्या ओल्या टॉवेल मधून पाणी गळत असताना बोटांत थोडा थरथराट जाणवत होता...
त्यांच्या चेहऱ्यावर थोडा थकवा आणि विजय यांचा विचित्र संगम होता...
त्या कण्हत, पण समाधानी स्वरात म्हणतात...
“हं… सुरुवातीपासूनच मला ती नकोशी वाटत होती...
जात जुळत नाही, संस्कार जुळत नाहीत…
पण तुझा दादाच आंधळा झाला होता प्रेमात तीच्या...
आज देवानेच आपल्याला ती संधी दिली... घरातून घाण साफ करण्याची...”

क्षणभर त्यांच्या डोळ्यांत आनंदाची चमक उमटते,
मग ती लगेच कठोरतेच्या पडद्याआड लपवली जाते...
“आता तुझ्या दादासाठी दुसरी बायको शोधायला आपणच सुचवायचं…
योग्य घरची… आपल्यासारखी सुसंस्कृत…
आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या जातीतील...”
नणंद हसते...
मग ती लगेच कठोरतेच्या पडद्याआड लपवली जाते...
“आता तुझ्या दादासाठी दुसरी बायको शोधायला आपणच सुचवायचं…
योग्य घरची… आपल्यासारखी सुसंस्कृत…
आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या जातीतील...”
नणंद हसते...
त्या हसण्यात गोडवा होता...
पण तो पिढ्यान्पिढ्या वाहत आलेल्या विषाने भरलेला होता...
पण तो पिढ्यान्पिढ्या वाहत आलेल्या विषाने भरलेला होता...
दोघींच्या चेहऱ्यावरचं ते विजयी समाधान
एका निर्दयी यशाची साक्ष देत होतं...
जणू घरातलं साम्राज्य वाचलं होतं,
जात जपली गेली होती,
आणि एका स्त्रीचं आयुष्य उद्ध्वस्त झालं…
याचाच त्यांना अभिमान होता....
एका निर्दयी यशाची साक्ष देत होतं...
जणू घरातलं साम्राज्य वाचलं होतं,
जात जपली गेली होती,
आणि एका स्त्रीचं आयुष्य उद्ध्वस्त झालं…
याचाच त्यांना अभिमान होता....
क्रमशः....
©® प्राची कांबळे (मिनू)
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही."
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा